खंदकात कोसळून दोन गुरांचा मृत्यू : पंचायत मंडळाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांत संताप
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयात अनेक ठिकाणी सुरू असलेला बेकायदा चिराखणींचा व्यवसाय सध्या बंद करण्यात आलेला आहे. मात्र ज्या ठिकाणी चिऱयांचे उत्खनन केलेल्या ठिकाणी खोल खंदक तयार झालेले आहेत. त्यामध्ये पावासाचे पाणी भरलेले आहेत. दोन दिवसांपूर्वी पिसुर्ले येतील एका खंदकांत दोन जनावरे कोसळून त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सदर असुरक्षित खंदकांमधील प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
सत्तरी तालुक्मयातील उत्खनन केलेल चिरेखाणीच्या उघडय़ा खंदक पाणी भरल्यामुळे माणसांना तसेच जनावरांसाठी धोकादायक बनले आहेत. पिसुर्ले भागामध्ये अशा प्रकारचे मोठय़ा प्रमाणात खंदक आहेत. त्यातही प्रचंड प्रमाणात पाणी भरलेले आहे. या खंदकाच्या भोवती सुरक्षेच्या दृष्टीने कुंपण नसल्यामुळे त्यात माणसे किंवा जनावरे कोसळून अनुचित घटना घडू शकते. याबाबत पिसुर्ले पंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रश्न अनेक वेळा पिसुर्ले पंचायतीच्या ग्रामसभेमध्ये उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे अनेकवेळा वर्तमानपत्राच्या माध्यमातून सरकारचे व पंचायतीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र याबाबत अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या पिसुर्ले व इतर भागातील खंदक मोठय़ा प्रमाणात धोकादायक बनले असून यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. या संदर्भात अधिक माहिती देताना नागरिकांनी सांगितले की दोन दिवसापूर्वी दोन गुरे सदर खंदकांमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता .तर यापूर्वी अशाच प्रकारे एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी सरकारची यंत्रणा या संदर्भात जागी होणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे स्थानिक पंचायतीने याबाबत विशेष लक्ष देणे गरजेचे होते. मात्र पंचायतीचे मंडळ याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे .यामुळे सर्वसामान्य नागरिक व जनावरांसाठी पाण्याने भरलेले खंदक धोक्मयाची घंटा ठरू लागले आहेत.
दरम्यान, पिसुर्ले पंचायत क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाणींचा व्यवसाय सुरू असतो. जवळपास 15 पेक्षा जास्त चिरेखाणी पंचायत क्षेत्रामध्ये सुरू आहेत. मात्र एकाही खंदकाच्या भोवती कुंपण घालण्यात आलेले नाही. सदर खंदक उघडे असल्यामुळे गुरांसाठी अत्यंत धोका निर्माण झालेला आहे?. याची गांभीर्याने दखल घेऊन पिसुर्ले पंचायत व पोलीस त्याचप्रमाणे खाण खात्याच्या अधिकाऱयांनी याची दखल घेऊन सर्व खंदकांभोवती सुरक्षा कुंपण उभारण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. दरम्यान पंचायत मंडळ या गंभीर विषयाके दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.









