प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. मंगळवारी दुपारी प्रकाशित झालेल्या आरोग्य खात्याच्या माहिती पत्रकामधून पिरनवाडी (ता. बेळगाव) येथील एका 33 वषीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे बेळगाव जिल्हय़ात रुग्णांची संख्या आता 18 वर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्ण संख्येमध्ये राज्यात तिसऱया स्थानावर आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत असून त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. पिरनवाडीतील सदर रुग्ण हा दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात सहभागी होऊन परतल्यानंतर त्याला या विकाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या बेळगाव तालुक्मयातील हिरेबागेवाडी आणि बेळगुंदी या गावांपाठोपाठ आता पिरनवाडीत कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे बनले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत नव्याने भर पडत असल्यामुळे संपूर्ण तालुका ढवळून निघाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरदेखील कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत दि. 3 मे पर्यंतची वाढ करण्यात आली. या घोषणेच्या पाठोपाठच बेळगाव तालुक्मयात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती जाहीर करण्यात आली. यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत असणाऱया पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 वर पोहोचली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रभावामुळे आरोग्य खात्यासह संपूर्ण जिल्हा प्रशासनावरील ताण वाढला आहे. सरकारी यंत्रणेकडून कोरोना नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत









