प्रतिनिधी / बेळगाव
हायटेक मोटर्स अँड ऑटोमोबाईल्स या पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि. च्या बेळगाव, बागलकोट जिल्हय़ातील अधिकृत विपेत्यांनी 11 पियाजिओ ऍपे ई-एक्स्ट्रा इलेक्ट्रिक 3 व्हिलर कार्गो वाहनांची पहिली तुकडी संकेश्वर व्हेंचर्स प्रा. लि. ओंकार मिनरल वॉटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र संकेश्वर यांना 1 नोव्हेंबर रोजी हायटेक मोटर्सच्या गांधीनगर-बेळगाव येथील शोरुममधून डिलिव्हरी दिली.
कार्यक्रमात रविंद्र संकेश्वर म्हणाले की, संकेश्वर मिनरल वॉटर ही राज्यातील पहिली कंपनी आहे, ज्यांनी ओंकार मिनरल वॉटर व्यवसायासाठी पियाजिओ इलेक्ट्रिक थ्री व्हिलर खरेदी करून इलेक्ट्रिक मोबिलिटीवर स्वीच केले आहे. वाहनाची भार सहन करण्याची क्षमता तपासण्यासाठी या वाहनाची चाचणी केली आहे. ही वाहने इलेक्ट्रिक श्रेणीत सर्वोत्कृष्ट वाटतात आणि हायटेक मोटर्स बेळगावकडून इलेक्ट्रिक वाहने विकत घेत असताना आम्हाला अत्यंत समाधान वाटते. शंभर टक्के पर्यावरण अनुकूल वाहन, इंधन खर्चात सर्वाधिक बचत आणि डिझेल-पेट्रोल वाहनांच्या तुलनेत प्रत्येक किलोमीटरमध्ये दोन ते तीन रुपये बचत होते, हे या वाहनाचे सर्वोत्कृष्ट गुण आहेत.
हायटेक मोटर्स अँड ऑटोमोबाईल्स प्रा. लि. बेळगावचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र देसाई यांनी सांगितले, की पेट्रोल, डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या किमती अपरिवर्तनीय आहेत. ईव्ही वाहन पेट्रोल आणि डिझेल तीनचाकी वाहनांच्या तुलनेत खूपच स्वस्त दराने म्हणजे एकदा चार्ज केले तर 90 किलोमीटर जाते. व्हीआरएल ग्रुप, आशिया पॅसिफिकमधील नंबर वन लॉजिस्टिक कंपनी आहे. त्यांनी पियाजिओ ऍपे इलेक्ट्रिक कार्गो तीनचाकी वाहन निवडले आहे. हे या वाहनाच्या उत्कृष्ट उत्पादन गुणवत्तेचे एक उदाहरण आहे. पियाजिओ इलेक्ट्रिक वाहनांना तीन वर्षांची वॉरंटी व तीन वर्षांची एएमसी फ्री आहे. जेणेकरून ग्राहकांना पुढील तीन वर्षांसाठी सर्व्हिस खर्चाची डोकेदुखी राहणार नाही. पियाजिओ ऍपे इलेक्ट्रिक वाहनावर रुपये 69 हजार सरकारी अनुदान आहे. याचा खर्च प्रतिकिलोमीटर फक्त 39 पैसे आहे. हे वाहन तीन तासांच्या चार्जिंगमध्ये फक्त 6 युनिट खर्चासह 90 किलोमीटर मायलेज देते. त्यांनी ग्राहकांना या इलेक्ट्रिक मोबिलिटीचा एक भाग होण्याचे आवाहन केले. भरपूर पैसे वाचवा, ध्वनी व वायू प्रदूषणापासून पर्यावरण वाचवा, असा संदेश त्यांनी दिला.
याप्रसंगी श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्सचे जनरल मॅनेजर उदय चन्नावर म्हणाले, श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनी जिल्हय़ातील इच्छुक ग्राहकांना उपरोक्त कागदपत्रे असल्यास फक्त 24 तासांमध्ये जास्तीत जास्त कर्जनिधी उपलब्ध करून देऊ शकतात. संचालक विनयकुमार बाळीकाई यांनी हायटेक ग्रुपने आपला व्यवसाय कसा सुरू केला आणि प्रगतीचा प्रवास सांगितला. बेळगाव आणि बागलकोटच्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी बेळगाव आणि बागलकोट जिल्हय़ात विस्तार केला.
याप्रसंगी संचालक हायटेक मोटर्स अँड ऑटोमोबाईल्स प्रा. लि. बेळगावचे संचालक राजेश भोसगी, बसवराज तंगडी, व्यवस्थापक अरुण गलगली, एच. टी. हिरेमठ तसेच श्रीराम फायनान्सचे व्यवस्थापक शीतल चौगुले आदी उपस्थित होते.









