ऑनलाईन टीम / जम्मू :
फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी देखील आता कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर ते होम आयसोलेट झाले आहेत. उपचारांसह सर्व नियमांचे ते काटेकोरपणे पालन करत आहेत. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मागील एक वर्षापासून मी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र, या घातक विषाणूची आता मला देखील लागण झाली आहे.
दरम्यान, मागील महिन्यातच उमर अब्दुल्ला यांचे पिता आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावेळी उमर अब्दुल्ला यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करीत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांची दुसऱ्यांदा टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आले आहेत. त्यानंतर आता उमर अब्दुल्ला यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.