ऑनलाईन टीम / पिंपरी :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. त्यामध्ये पिंपरी शहरातील दोन तर शहराबाहेरील दोन अशा चार जणांचा समावेश आहे. यामुळे आतापर्यंत पिंपरीतील कोरोना बळींची संख्या 24 वर गेली आहे.
शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम, भोसरी आणि काही खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील दोन तर शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाचदिवशी चार जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील 10 तर हद्दीबाहेरील पण महापालिका रुग्णालयात 14 जणांचा अशा एकूण 24 जणांचा आजपर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.








