वाठार किरोली / वार्ताहर :
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना शेतीची कामे वेळेत व्हावीत, म्हणून कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. कोरेगाव व तालुका कृषी अधीक्षक कार्यालय कोरेगाव यांचे नियोजनातून कोरेगाव संघाच्या शाखा पिंपरी येथून शेतकऱ्यांना बांधावर खते वाटप करण्यात आली. कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाने केलेल्या बांधावर खत वाटप या योजनेचे शेतकरी बांधवांमधून कौतुक होत आहे. यावेळी बाळसिध्द स्वयंसहाय्यता बचतगट पिंपरीचे प्रगतशील शेतकरी शहाजी कणसे व त्या गटाच्या सभासदांना खत वाटप करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन सुनील माने, कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भागवत घाडगे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव पवार, सह्याद्री सहकारी कारखान्याचे संचालक वसंतराव कणसे, कृषी सहायक पवार, पिंपरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नानासो पवार, अनंत साबळे, यशवंत चव्हाण व शेतकरी बांधव उपस्थित होते.









