सातारा / प्रतिनिधी :
गोंदवले (ता. माण) येथील भाड्याच्या खोलीत अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गोंदवले बुद्रुक येथे दि. 21 मे 2021 रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास एका भाड्याच्या खोलीत अल्पवयीन मुलीचे सुरेश राजाराम जाधव (रा. पिंगळी खुर्द) याचा विवाह लावून दिला. त्याप्रकरणी रत्नाबाई भिमराव मदने (रा सत्रेवाडी), योगेश राजाराम जाधव, मारुती अण्णा जाधव, राजाराम जाधव व सुरेश जाधव यांच्यावर बालविवाह कायदा कलम 10, 11, 9 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला पोलीस नाईक वाय. आर. मोरे हे तपास करत आहेत.









