वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाची 30 वर्षीय महिला टेनिसपटू ऍनास्तेशिया पाव्हल्युचेंकोव्हाला गुडघा दुखापत झाल्याने तिला आता किमान दहा आठवडे टेनिस क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागणार आहे.
पाव्हल्युचेंकोव्हाने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत एकेरीची अंतिम फेरी गाठली होती तर गेल्या नोव्हेंबरमध्ये तिने महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत 11 वे स्थान मिळविले होते. 2021 चा टेनिस हंगाम पाव्हल्युचेंकोव्हाला यशस्वी ठरला होता. तिने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविले होते. ऑलिंपिक स्पर्धेनंतर तिला गुडघा दुखापतीने चांगलेच त्रासले होते. अलिकडेच्या कालावधीत तिला अनेक स्पर्धामध्ये सहभागी होता आले नव्हते. डॉक्टरांनी तिला किमान दहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 22 मेपासून सुरू होणाऱया प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत ती कदाचीत सहभागी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.