प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात पावसाळ्य़ात येणाऱया आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आह़े विविध उपाययोजनांसाठी कोकणाला राज्य शासनाकडून 900 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत़ यामध्ये रत्नागिरी जिह्याला सर्वाधिक निधी देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल़ी
पावसाळ्य़ाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची बैठक घेण्यात आल़ी यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिल़ी जिह्यातील अंडरग्राउंड केबलचे 70 टक्के काम पूर्ण झाले आह़े उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार असून पावसाळ्य़ात विजेमुळे होणारे नुकसान टळणार आह़े शेल्टर हाऊस, धूपप्रतिबंधक बंधारे व इतर बाबींसाठी निधी उपलब्ध झाला आह़े मागील वर्षीपेक्षा सुमारे 50 मिमी अधिक पाऊस पडू शकतो, हे ग्राह्य धरून उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत़ चिपळूण येथे आलेल्या पुराची परिस्थिती लक्षात घेता बोट सज्ज ठेवण्यात येणार आह़े वाशिष्टी नदी पात्रातील 7 लाख 84 क्यूबिकपैकी 7 लाख 60 हजार क्यूबिक मीटर गाळ आतापर्यंत काढला आह़े चिपळूण येथे उपसण्यात आलेली वाळू जलसंपदा विभागाकडून योग्य ठिकाणी साठवली जाणार आह़े ही वाळू पुन्हा नदीपात्रात येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आह़े हरचेरी येथील वाळू योग्य प्रकारे साठवण्याबाबत विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी विमानतळ पूर्ण झाल्यानेच विरोधक आंदोलनाच्या मार्गावर
रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आह़े आता विरोधक आंदोलनाच्या मार्गालाही लागतील़ आमच्यामुळेच विमानतळ पूर्ण झाले, अशी सिंधुदुर्गसारखी वेळ विरोधकांवर आली आहे, असा टोला मंत्री सामंत यांनी माजी खासदार नीलेश राणे यांना यावेळी लगावल़ा विमानतळासंदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची आपण भेट घेणार असल्याचेही सामंत यांनी सांगितल़े
रत्नागिरीतील गाडय़ांसाठी टोलमुक्तीची मागणी
सिधुंदुर्ग जिह्यात रस्त्याचे काम पूर्ण झाले नसतानाच टोल वसुली करण्याला विरोध करण्यात आला आह़े सिंधुदुर्ग जिह्यात एमएच 07 तर रत्नागिरी जिह्यात एमएच 08 गाडय़ांकडून टेल वसुली करू नये, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितल़े हिजाबला विरोध करण्याऐवजी मुले महाविद्यालयात येणे








