प्रतिनिधी /येळ्ळर
नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे तानाजी गल्ली-येळ्ळूर येथील घर कोसळले आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. यावेळी घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. तानाजी गल्ली येथील मारुती चांगाप्पा इंगळे यांचे हे घर आहे.
गेल्या सहा दिवसांपासून येळ्ळूर परिसरात जोरदार पाऊस कोसळत होता. त्या पावसामुळे घराची एक भिंत कोसळली. घर कौलारू होते. त्यामुळे संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले आहे. यावेळी घरात कोणीही नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा ग्राम पंचायतीने तातडीने पाहणी करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









