नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
गेल्या 48 तासांत उत्तराखंडमध्ये धुवांधार पाऊस झाला आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे रानी पोखरी जवळील देहरादून-ऋषिकेश पूल तुटला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मालदेवता-सहस्रधारा लिंक रोड अनेक मीटरपर्यंत नदीत सामावला आहे. ही घटना खेरी गावामधील आहे. येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तडे गेले आहेत आणि पूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील दोन गाड्या वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.
बरोबर मध्यभागीच पूल खचल्याने दोन्ही बाजूंच्या गाड्या पुरात अडकल्या. त्यातच बऱ्या अवस्थेत असलेल्या पुलाच्या भागातही हळूहळू भेगा पडत आहेत. गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा जोर वाढला आणि राणीपोखरी ते ऋषिकेश दरम्यान जाखन नदीवरचा पूल मधोमध खचला. पूल खचल्यामुळे ऋषिकेशकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली असल्याचे उत्तराखंडचे जिल्हा अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









