प्रतिनिधी / फोंडा
फोंडा भागात काल शुक्रवारी अचानक वीजेच्या गडगडाटासह सकाळी 10 वा. सुमारास पावसाने हजेरी लावली. कोसळणाऱया पावसाच्या सरीमुळे जीवनाश्यक वस्तू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबाळ उडाली. तरीही सकाळी 6 वा. सुरू झालेल्या बाजारावर कोणताच परिणाम जाणवलेला नाही. फोंडा पोलीसांनी कारवाईसाठी 11 वा. सुमारास बाजार परिसरात दाखल झाल्यानंतर व्यापाऱयांनी काढता पाय घेतला.
काल सकाळी दमट वातारणाचा अंदाज बांधून पावसाच्या शक्यता असल्याने बहुतेकांनी चारचाकीने बाजारहटीसाठी दाखल झाले होते. जीवनाश्यक वस्तूचे खरेदी हे निमित्तअसून खरी गरज ही मासळी बाजाराला भेट देणे असल्याची प्रतिक्रीया काही ग्राहकांनी दिली. नेहमीप्रमाणे मासळी बाजार काल शुक्रवारीही तेजीत होता. मात्र क्यापाऱयांच्या शीतयुद्धानंतर सामाजिक अंतर राखून मासळी विक्रेते विक्री करीत होते. मासळी मार्केटात परिस्थिती सुधारलेला असून काल पहिल्यांदा शिस्त पाहायला मिळाली. माणूसकीच्या दृष्टीने विचार करता मासळी विक्रेत्यांनी स्वेच्छा लॉकडाऊन करून इतर व्यापाऱयांना पाठिंबा दर्शवावा, जेणेकरून वाढत्या कोरोना संख्येचे साखळी तोडण्यास मदत होईल. रविवारपासून पुढील पंधरा दिवसासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘राज्य कर्फ्यु’ चा आदेश जारी केल्याने ही परिस्थिती सुधारणार काय याची फोंडावासियांना वाट पाहावी लागेल.









