प्रतिनिधी/ रत्नागिरी
हवामान खात्याकडून जिह्यामध्ये दोन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे खोल समुद्रात न जाता किनारापट्टीजवळच मासेमारी करणार असल्याची माहिती मच्छीमारांनी दिल़ी त्यामुळे मासळीच्या दरात काहीअंशी वाढ होण्याची शक्यता आह़े
शुक्रवारी सायंकाळपासूनच किनारपट्टीवर वेगवान वारे वाहण्यास सुरुवात झाली आह़े त्यामुळे मच्छीमारांनी आवश्यक खबरदारी घेतली आह़े सध्या सुरमई, गेजरसह लहान कोळंबी जाळ्यात मिळत आह़े या मासळीला समाधानकारक दर मिळत आह़े याशिवाय बाजारामध्ये कवचजन्य मासळीही मिळत आह़े मात्र अवकाळीच्या वातावरणामुळे मासळी खोल समुद्राकडे वळण्याची शक्यता आह़े सध्या सुरमई 400 ते 1 हजार रुपये किलो, कोळंबी लहान 100 ते 200 तर अन्य कालवी, तिसऱया मुळे आदी मासळी 100 ते 200 रुपये किलोने उपलब्ध असून चांगली मागणी आह़े
सुक्या मासळीचा तुटवडा
पावसाळ्यामध्ये ताजी मासळी नसल्याने सुक्या मासळीची खरेदी वाढत़े मात्र बंद आठवडा बाजार व अवकाळी पावसामुळे सुकी मासळी खराब झाल्यामुळे सुक्या मासळीचाही तुटवडा आह़े शहरामध्ये अलिबाग व अन्य ठिकाणाहून सुकी मासळी विक्रीस येत़े मात्र ती अपेक्षित प्रमाणात नसल्याचे मच्छीमारांनी सांगितल़े येत्या काही दिवसांमध्ये सुक्या मासळीची चांगली आवक होण्याची शक्यता आह़े
काजू, हापूस बागायतदार धास्तावले हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार, रत्नागिरी जिह्यामध्ये 21 व 22 मार्च रोजी काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवल्याने काजू, आंबा बागायतदार धास्तावले आहेत़ काही दिवसांपूर्वीच अवकाळीनंतर काजूवर बुरशी व करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाला होत़ा काजूचा मोहोर गळून पडल्यामुळे उत्पादनामध्ये घट जाणवली होत़ी दरम्यान या अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले उत्पादनही जाण्याची भीती काजू बागायतदारांनी व्यक्त केली आह़े हापूसला देखील ऐन हंगामात अवकाळीचा फटका बसणार आह़े बहुसंख्य बागायतदारांच्या बागेतील हापूस काढणीस तयार असल्यामुळे बागायतदार हवालदिल आहेत़