शनिवारपर्यंत पडण्याची शक्यता
प्रतिनिधी / म्हापसा
राज्यात पावसाचा मुक्काम आणखी 4 दिवस वाढला असून 22 मे पर्यंत तो सर्वत्र पडण्याची शक्यता आहे.पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात राज्यात सर्वत्र पाऊस पडला, मात्र अवघ्या काहीच केंद्रांमध्ये पावसाची नोंद झालेली दिसते. मंगळवारी 18 मे रोजी राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी तुरळक पाऊस पडून गेला. सकाळपासून आकाश पावसाळी ढगानी व्यापले होते. ढगाळ वातावरणात सकाळपासून तीन वेळा पणजीत पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 22 मे पर्यंत पाऊस गोव्यात हजेरी लावणार आहे. सध्या पडणारा हा पाऊस मान्सून पूर्व पाऊस आहे.
मान्सूनबाबत हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेली अनेक वर्षे केरळमध्ये 1 जून रोजी मान्सूनचे आगमन होत असते. काहीवेळा 4 दिवस पुढे जाऊ शकते. तेथून 5 दिवसांमध्ये गोव्यात मान्सून पोहोचतो. यावर्षी कदाचित 31 मे रोजी मान्सून गोव्यात पोहोचेल असा अंदाज आहे.









