शिरोळ प्रतिनिधी
घराचा बांधकाम परवाना मंजुरीसाठी पावणे दोन लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे, कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर,लिपिक सचिन सावंत व अमित संकपाळ या चौघांना जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले तर न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
शिरोळ येथील तक्रारदार व्यक्तीने येथील नंदीवाले वसाहत रोडवरील बिगर शेती प्लॉटमध्ये घर बांधण्यासाठी बांधकाम परवाची मागणी नगर परिषदेकडे केली होती मात्र त्यांना परवाना दिला जात नव्हता तक्रार यांनी मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांना फाईल मंजुरीसाठी 75 हजार रुपये बांधकाम फाईल पुढे पाठवण्यासाठी कनिष्ठ अभियंता संकेत हगरगेकर व लिपिक सचिन सावंत यांना एक लाख रुपये द्यायचे त्यानंतर बांधकाम परवाना देण्यातील असे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले अमित संकपाळ याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदारी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सोमवारी सायंकाळी लाच लुचपत प्रतिबंध अधिकाऱ्यांनी सापळा रचून पावणे दोन लाख रुपयांची लाख स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जयसिंगपूर येथील न्यायालयाच्या चौघांना उभे केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती डीवायएसपी सरदार नाळे यांनी दिले,,,