प्रतिनिधी / सातारा :
जे कर्मचारी शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी झटत आहेत.आपण घरात बसून पाहतो.त्यांना माहिती नसते की तो परिसर बाधित आहे मात्र, ते काम करत असतात.त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार एक जबाबदारी म्हणून हे शिबिर घेण्यात आल्याची माहिती सातारा पालिकेच्या आरोग्य सभापती सौ.अनिता घोरपडे यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने सातारा पालिकेच्या मंगल कार्यलयात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आरोग्य सभापती सौ.अनिता घोरपडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर, मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी वैधकीय अधिकायांना पीपीइ किट सामाजिक संघटनेकडून देण्यात आले.यावेळी आरोग्य सभापती अनिता घोरपडे म्हणाल्या,पालिकेच्या 272 कर्मचायांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आम्ही आता जी तपासणी करतोय ती खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार करत आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.जे लोक ग्राऊंड लेव्हलला काम करतात ते आपण घरात राहून पहातो की सफाई करत असतात. काम करत असताना त्यांना ही माहिती नसते की कोण कोरोना पेशंट आहे, कोण बाधित आहे.एक जबाबदारी म्हणून आरोग्य शिबिर घेतले आहे.शिबिरात कर्मचायांचे रक्तदाब, रक्त, रक्तातील साखर, शरीराचे तापमान तपासणी करण्यात आली, असे सांगितले.








