प्रतिनिधी / सातारा :
सातारा नगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक आम्ही नगरविकास आघाडीच्या माध्यमातून स्वबळावर लढवणार आहोत. नगरविकास आघाडी स्वतःच्या ताकदीवर निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे, असे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
आज सकाळी पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, नगरविकास आघाडी आपल्या स्वबळावर पालिकेची निवडणूक लढवणार आहे. निवडणूकीला उभे रहायला सगळय़ांना मुभा आहे. तो लोकशाहीने दिलेला आधिकार आहे. त्यामुळे कोणी लढवायची आणि कोणी नाही लढवायची हे आपण ठरवू शकत नाही. त्यामध्ये मग राष्ट्रवादी असु दे. सेनेचे असू दे. भाजपा असू दे की रिपाइं असे कोणाला बंधने घालू शकत नाही. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी लढवावी, त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. नगरविकास आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.