पालये / वार्ताहर पालये देऊळवाडा येथे राम परब कुटुंबियांच्या निवास्थानी लहान मुलांनी गणेशासमोर मातीच्या साहाय्याने साकारली किल्ल्याची प्रतिकृती.गणेशोत्सवाच्या निमित्ताने हरमल पंचक्रोशी व माऊंट कार्मेल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागवल्या ऐतिहासिक स्मृती.
विद्यार्थ्यांनी पालये येथील परब कुटुंबियांच्या निवास्थानी गणपती समोर रायगड किल्ल्याची प्रतिकृती
साकारताना चिकण माती,खडी व राखेचा वापर केला.यामध्ये इयत्ता दुसरी ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी सहभागी झाले होते.85 – 90 सद्स्य सांख्या असलेल्या परब कुटुंबीयांत पूर्वजांपासून चालत आलेल्या प्रथेनुसार एकत्रपणे गणेश मूर्तीचे सार्वजनिक पूजन केले जाते.परब कुटुंबियांतील लहान मुलांना देशाबद्दल व ऐतिहासिक वारश्याबद्दल आकर्षण असल्याने अनेकवेळा चित्रदेखाव्याबरोबरच ऐतिहासिक कलाकृती साकारण्याचे प्रयत्न केल्याचे परब कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले.यंदा परब कुटुंबीयाने श्री गणेशासमोर समोर बाल अवतारांतील दत्तजन्माची कहाणी देखावा साकारताना आत्रिक ऋषी,पत्नी अनुसूया व ब्रम्हा,विष्णू महेश यांचा चित्र देखावा दाखवण्यात आला असून समोरच दर्शनी भागांत मुलांनी भव्य ऐतिहासिक रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचे छोटय़ा मुलांनी प्रयन्त केले आहेत.









