केमिकल कंपनीत स्फोट; आठ ठार
अमोनिअम नायट्रेट एम-2 स्फोटक रसायन बनविणारी कंपनी
अग्निशमन दलाकडून शर्थींचे प्रयत्न सुरू
मुंबई / प्रतिनिधी
पालघर जिल्हय़ातील तारापूर औद्योगिक परिसरात असलेल्या ‘तारा नायट्रेट’ कंपनीत शनिवारी संध्याकाळी एक भीषण स्फोट झाला. एम-2 या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी 6.50 च्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत कंपनीच्या मालकासह आठ कामगारांचा दुदैवी मफत्यू झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी तीव्र होती की, आसपासच्या चार ते पाच किलोमीटरचे परिसर हादरून निघाला. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.
पालघरमधील तारापूर कोलवडे गावात तारा नाईट्रेट या नावाने ओळखल्या जाणाऱया कंपनीत हा स्फोट झाला. या कंपनीमध्ये हे अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात होते. या स्फोटामध्ये कंपनी काम करणारे कामगार आणि कंपनीचे मालक नटुभाई पटेल यांची मृत्यू झाल्याची माहिती आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, त्याचा आवाज 25 ते 30 किलोमीटर अंतरापर्यंत डहाणू आणि पालघरपर्यंतच्या गावांमध्ये ते ऐकू आला. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा भास सुरुवातीला झाला. मात्र, काही वेळाने हा स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्य म्हणजे स्फोटाच्या हादऱयामुळे बाजूला बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. या इमारती खालीही काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे अपघाताची तीव्रता नेमकी समजू शकली नाही. तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मफत कामगारांचा शोधण्याचे तर जखमी कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मफतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत
मुख्यमंत्री स्वत: बचाव कार्यावर लक्ष ठेवून
तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मफतांच्या वारसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे, असे निर्देश प्रशासनाला दिले.
स्वत: मुख्यमंत्री हे बचावकार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी या स्फोटाची माहिती मिळताच तत्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच यामधील बचावकार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.









