ऑनलाईन टीम / पालघर
पालघर जिल्हा मोखाडा तालुक्यातील ब्राह्मण गाव येथे लागलेल्या आगीत एका कुटूंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी ही आग शॉर्ट सर्किटमुळे आगली असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे.
ब्राम्हण गाव मधील अनंता मौळे यांच्या मालकीचे घर आणि शेजारीच असणाऱ्या दुकानाला रात्री अडीचच्या सुमारास ही आग लागली. गावकऱ्यांनी ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र, घरातील सर्व सदस्य गाड झोपेत असल्याने बाहेर येऊ न शकल्याने चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये अनंता मौळे यांची आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, १५ वर्षांची मुलगी पल्लवी मौळे आणि दहा वर्षांचा मुलगा कृष्णा मौळे यांचा समावेश आहे. तर काही सदस्य हे आगीतून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. या दुर्देवी घटनेमध्ये अनंता मौळे आणि त्यांची दोन मुलांचा जीव वाचू शकला. तसेच १२ वर्षीय भावेश आणि १७ वर्षीय अश्विनी यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. तर घर मालक अनंता हे मोखाडा येथे उपचार घेत आहेत. पोलीसांकरवी या घटनेचा तपास सुरु असुन आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकेल नाही.