मुंबई \ ऑनलाईन टीम
पालघरच्या डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथील फटाका कारखान्यात आज सकाळी आग लागून भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केल्याने ज्वाळा २० ते २५ किमी वरूनही दिसत होत्या. डहाणू, तारापूर एमआयडीसी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,कारखान्यात वेल्डिंगचं काम सुरू होतं, त्याचदरम्यान आग लागल्याने हा स्फोट झाला आहे.कारखान्यात मोठ्या प्रमाणात कामगार अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू झाले आहे.
स्फोटात दहा जण भाजले असून एक जण गंभीररीत्या जखमी आहे. जखमींना डहाणू आशागड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








