ऑनलाईन टीम / पालघर :
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या घटत असली तरी मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहे आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान, पालघर जिह्यातील एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमधील सफाळे येथील टेकरीचा पाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली आहे.
पालघरमधील जन्माला आल्यानंतर 12 तासाने एका नवजात बालकाला कोरोना अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यावेळी त्याच्या आईचीही चाचणी करण्यात आली. मात्र आईची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर बाळाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या या बालकाची आई पालघर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर नवजात बाळाला जव्हार येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.








