प्रतिनिधी / कोल्हापूर
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे जिल्ह्यातील आमदार, खासदार यांच्याशी संवाद साधत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि इतर प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे आदी सहभागी झाले होते.
प्राधान्य गटात नसणाऱ्या केशरी शिधापत्रिका धारकांना रेशन धान्य मिळायला हवे, अशी सूचना आमदार आवाडे, आमदार आवळे यांनी यावेळी केली. खासदार माने यांनीही केसरी कार्डधारकांना अन्न-धान्य मिळण्याची मागणी करुन, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाँक्टरांना पीपीई कीट मिळावेत आणि खासगी दवाखाने सुरु व्हावेत, असे सांगितले.
इंचनाळ ते गजरगाव हा रस्ता ग्रामस्थांसाठी सुरु करण्याची सूचना करुन आमदार राजेश पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना डिझेल-पेट्रोल मिळावे. त्याचबरोबर चंदगडला रुग्णवाहिका मिळायला हवी. पोलीस आणि गृहरक्षक दलांची संख्या कमी पडत असून, ती वाढवून मिळावी. आमदार ऋतुराज पाटील यावेळी म्हणाले, रुग्णांवर वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षिततेसाठी पीपीई कीट देण्यात यावेत. त्याचबरोबर निर्जंतुकीकरण फवारणी आणि नियमित स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. तसेच सध्याच्या कालावधित बंद असणारे खासगी दवाखाने सुरु ठेवावीत. रुग्णांची गैरसोय होणार नाही, यासाठी सध्या दोन डॉक्टरांसह मतदार संघात ग्रामीणसाठी चार रुग्णवाहिका ठेवल्या आहेत.
पालकमंत्री पाटील यांनी या सूचनांचा स्वीकार करुन संबंधितांना निर्देश दिले जातील, असे सांगितले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व सूचनांची पूर्तता करण्यात येईल, तसे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आजच देवू, असे सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









