कणकवली / वार्ताहर-
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त कणकवली येथे अक्षरश : शुभेच्छांचा वर्षाव झाला. सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी येथील शिवसेना कार्यालयासमोर सकाळपासूनच शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी, मला देण्यात आलेल्या या जिव्हाळ्याच्या शुभेच्छा वाया जाऊ देणार नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी दिली. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कामगार नेते आप्पा पराडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, महिला आघाडीच्या नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, शैलेश भोगले, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, युवा सेनेचे राजू राठोड आदी उपस्थित होते.









