प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत 11 व 12 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या दौऱयावर येत आहेत.
रविवार 11 रोजी दुपारी 4.30 वा. वाघोटण (देवगड) गावास भेट व पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 5.30 वा. देवगड येथून सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, सायंकाळी 7 वा. पोलीस मुख्यालय, शासकीय विश्रामगृह येथे आगमन, राखीव व मुक्काम.
सोमवार 12 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासवमेत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आढावा बैठक, दुपारी 12 वा. डीपीडीसीच्या नूतन सभागृहात जनता दरबार, दुपारी 2 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यकारी अभियंता, कुडाळ एमआयडीसी व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा कामगार कल्याण अधिकारी, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीचे पदाधिकारी यांच्यासमवेत सुरक्षा रक्षकांच्या वेतन समस्येबाबत चर्चा, दुपारी 2.15 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा, दुपारी 2.30 वा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रतिनिधींसोबत बैठक, दुपारी 2.45 वा. प्रादेशिक अधिकारी, एमटीडीसी प्रादेशिक बंदर अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता महावितरण, पर्यटन व्यवसायिक प्रतिनिधी, जिहय़ातील पर्यटन व्यवसायिक बैठक, दुपारी 3 ते 4 वा. राखीव, दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सायं. 5 वा. खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय ओरोस येथे अभ्यागतांच्या भेटी, सायं. 5.30 नंतर सोईनुसार ओरोस सिंधुदुर्ग येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.