प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत हे 6 मार्च रोजी सिंधुदुर्ग दौऱयावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी 6.40 वा. दाभोळी विमानतळ गोवा येथून शासकीय विश्रामगृह सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, सकाळी 9.30 वा. ओरोस शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 11.30 वा. मोटारीने मसुरे-आंगणेवाडीकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. मौजे देऊळवाडा, धरणस्थळ दत्त मंदिरजवळ, मसुरे येथील मृदा व जलसंधारण विभागअंतर्गत लघु पाटबंधारे योजना व लघु पाटबंधारे योजना कुंभवडे, येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन होणाऱया भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 1 वा. मसुरे-आंगणेवाडी येथून मोटारीने मालोंड-मालडी (पाणवठा)कडे प्रयाण, दुपारी 1.30 वा. येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱयाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2 वा. मोटारीने कुडाळकडे प्रयाण, दुपारी 3 वा. एमआयडीसी विश्रामगृह, कुडाळ येथे राखीव, दुपारी 3.30 वा. कुडाळ शहर शिवसेना पदाधिकाऱयांसोबत बैठक, दुपारी 4.45 वा. एमआयडीसी विश्रामगृह येथे महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक, सायंकाळी 5.30 वा. कुडाळ येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण. smart.in









