कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सकाळी 11 वाजता प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल होणार आहे पालकमंत्री सतेज पाटील हे गगनबावडा सेवा सोसायटी मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कागल सेवा सोसायटी मतदार संघातून अर्ज भरणार आहेत.









