नवी दिल्ली : वर्ष 2022 पर्यंत तब्बल 10 हजार कोटी रुपयाच्या व्यवसायाची उलाढाल करणार असल्याचे ध्येय पार्ले ऍग्रोने निश्चित केले आहे. बेव्हरेज क्षेत्रातील कंपनीच्या लोकप्रिय ब्रँडमध्ये प्रूटी आणि अप्पी फिज यांचा समावेश आहे. अशी माहिती कंपनीच्या मुख्य अधिकाऱयांनी दिली आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रपणे प्रकल्प उभारण्याची योजना असून यातून नवनवीन उत्पादने बाजारात दाखल करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने 2019 मध्ये 6,500 कोटी रुपयाची उलाढाल केली होती. चालू वर्षात कंपनीने व्यवसायामध्ये 10 टक्क्यांची वृद्धी राहणार असल्याचे ध्येय काम ठेवले आहे.
निवडक उत्पादनाचे सादरीकण?
सामान्यपणे एक कंपनी म्हणून आम्ही मोठय़ा प्रमाणात नवीन उत्पादने बाजारात आणत नाही. परंतु काही निवडक अशा विशेष स्वरुपात स्पर्धेत टक्कर देणारी उत्पादनं मात्र बाजारात उतरण्यावर पार्ले भर देणार असल्याचा विश्वास संयुक्त कार्यकारी संचालक आणि मुख्य मार्केटिग अधिकारी नादिया चौहान यांनी व्यक्त केला आहे.









