तितक्या रकमेत घेऊ शकाल 3 बीएचकेचे घर
ब्रिटनमध्ये एका घराची सरासरी किमंत 2 कोटी रुपये असते, पण राजधानी लंडनमध्ये कार पार्किंगची एक जागा 2 कोटी 11 लाख रुपयांमध्ये विकली जात आहे. ही पार्किंग स्पेस हाइड पार्कमध्ये असून ऑक्सफोर्ड स्ट्रीटनजीक आहे.
लंडनमध्ये ज्या किमतीत ही जागा विकण्यात येत आहेत, तितक्याच रकमेत ब्रिटनच्या ग्रामीण भागांमध्ये बाग आणि पार्किंगसह 3 बीएचके घर खरेदी करता येते. हाइड पार्क येथील पार्किंग स्पेसच्या खरेदीदाराला संबंधित जागा 85 वर्षाच्या भाडेतत्वावर मिळणार आहे. खरेदीदाराला स्वतःची गाडी सिटी सेंटरमध्ये पार्क करावी लागणार नसल्याने त्याची काही प्रमाणात बचत होणार आहे. गर्दीच्या वेळेत लंडनमध्ये पार्किंगची जागा शोधणे लोकांसाठी त्रासदायक असते. पण लंडनच्या हाइड पार्कमधील पार्किंग एकमेव महागडी जागा नाही. काही महिन्यांपूर्वीच लंडनचे शेजारी शहर नाइट्सब्रिजमध्ये पार्किंगची एक जागा 3 कोटी 51 लाख रुपयांमध्ये विकली जात होती. ब्रिटनमध्ये पार्किंगची सर्वात महागडी जागा 2014 मध्ये विकण्यात आली होती. तेव्हा त्याची विक्री 4 कोटी रुपयांमध्ये झाली होती.









