मुंबई / ऑनलाईन टीम
दिलीप वळसे-पाटील यांनी आज राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी जबाबदारी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगि
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, मी आजच पदभार स्वीकारला आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचे काम मी करेल. सध्याचा काळ अवघड आणि चॅलेंजिंग आहे. कोरोनामुळे पोलीस फोर्स रस्त्यावर आहेत. फिल्डवर काम करत आहे. पोलीस दलाचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आहे. तरीही कोरोनामुळे त्यांना ही ड्युटी करावी लागत आहे. त्यातच आता एप्रिलमध्ये विविध सण-उत्सव आहेत. प्रत्येक धर्मीयांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे दिवस आहेत. त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिंग परिस्थिती असणार आहे.
महिला आणि सामान्य नागरिकांना गृहविभागाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार आहे. त्याकरिता आजीमाजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यात येईल. स्वच्छ प्रशासन देण्यावर भर असेल. तसेच प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही. बदल्याच्या संदर्भात प्रत्येक विभागाची जी पद्धत ठरली आहे, वेगवेगळ्या स्तरावर जे अधिकार दिले आहेत. त्यानुसार काम करू, शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणे, पोलिसांना घरे देणे या सर्व गोष्टींवर लक्ष देणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, कोण काय आरोप करत आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझा पारदर्शक कारभार करण्यावर भर असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच दैनंदिन दिवसांमध्ये छोटे-मोठे गुन्हे होत असतात. हे गुन्हे निपटून काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








