रावतच्या चॉपर कॅशचा अहवाल
ऑनलाईन टीम/तरुण भारत
तामिळनाडूच्या कुन्नुर येथे आठ डिसेंबर रोजी CDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या अपघाताविषयी अधिकची माहिती आता समोर आली आहे. रावत यांचा हेलिकॉप्टर हा पायलटच्या चुकीमुळे क्रॅश झाल्याचे तपासात समोर आले आहे. चॉपरमध्ये कोणत्याही प्रकारे टेक्निकल अडथळा नव्हता, तसेच कोणत्याही प्रकारचे षडयंत्र देखील नसल्याचे समोर आले आहे. तिन्ही दलाच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्त तपासातून ही माहिती समोर आली आहे.
इंडियन एयरफोर्सने याबाबत म्हटले आहे की, हवामान खराब असल्याने तसेच हवामानात अचानक बदल झाल्याने पायलटने हेलिकॉप्टर खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यादरम्यान हेलिकॉप्टर चुकून डोंगराळ भागात आदळला.
एयरफोर्सने सांगितले की, फ्लाइट डेटा आणि कॉकपिट वॉयस रिकॉर्डर तपासले असता, त्यात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा तसेच मशीनांसोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्यात आलेली नाही. आठ डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेचा MI-17 हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नुर या भागात क्रॅश झाला होता. या अपघातात जनरल बिपिन रावत यांची पत्नी मधुलिका यांच्यासह 12 जणांचा अपघातात मृत्यू झाला होता.









