संशयीत आरोपी सचिन अंदूरे व भरत कुरणे यांनी केला होता जामीन अर्ज, निकालाकडे संपूर्ण राज्यासह कर्नाटक राज्याचे लक्ष
प्रतिनिधी / कोल्हापूर
जेष्ठ विचारवंत आणि कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी सचिन अंदूरे व भरत कुरणे या दोघांनी दाखल केलेल्या जामीनावर मुक्तता करावी. या दाखल केलेल्या अर्जावर शुक्रवारी दुपारी सुनावणी होवून, हा अर्ज २४ ऑगस्टला निकाल ठेवण्यात आला. याबाबत कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघा संशयीत आरोपीच्या वकीलाचा आणि विशेष सरकारी वकीलाचा युक्तीवाद पुर्ण झाला.
कॉ. पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यत विरेंद्रसिंह तावडे, सारंग आकोळकर, विनय पवार, सचिन अंदूरे, भरत कुरणेसह २१ जणाविरोधी गुन्हे दाखल केले. यापैकी आकोळकर व पवार हे दोघे अद्यापी पसार असून, याचा तपास यंत्रणेकडून कसून शोध घेतला जात आहे. याच दरम्यान अटक केलेल्या अंदूरे आणि कुरणे या दोघानी आपली जामिनावर मुक्तता करावी. यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर शुक्रवारी दोघा संशयीत आरोपीच्या वकीलाचा आणि विशेष सरकारी वकीलाचा युक्तीवाद पूर्ण झाला. त्यानंतर न्यायालयाने संशयीत आरोपी अंदूरे व कुरणे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्ज सोमवारी ( २४ ऑगष्टला ) निकाल ठेवण्यात आला. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्यासह कर्नाटक राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









