पादत्राणांची खरेदी वाटते तितकी सोपी नसते. उगाचच स्वस्तातली, फारशी आरामदायी नसणारी पादत्राणं खरेदी करण्यापेक्षा थोडे पैसे खर्च करून चांगल्या दर्जाची पादत्राणं खरेदी करायला हवीत. पादत्राणांची खरेदी करताना नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याविषयी…
- पादत्राणांची स्टाईल आणि डिझाईनपेक्षाही ती आरामदायी आहेत ना, याकडे लक्ष द्या. स्टाईलच्या नादात घट्ट किंवा फार सैल पादत्राणं घेऊ नका. पादत्राणं घालून थोडं चालून बघा. आरामदायी वाटली तरच ती खरेदी करा.
- चालण्यासाठी किंवा व्यायामासाठी चांगल्या ब्रँडचे बूट खरेदी करा. ब्रँडेड बूट महाग असले तरी व्यायामाच्या दृष्टीने योग्य ठरतात.
- उंच टाचेच्या चपलांचा वापर टाळा. त्याऐवजी सपाट पादत्राणं वापरा. उंच टाचेच्या चपलांमुळे पाय दुखू शकतात. तसंच तळव्यांनाही त्रास होऊ शकतो. खरेदीसाठी किंवा कामासाठी बरंच चालायचं असेल तर सपाट पादत्राणं वापरणं योग्य ठरतं.
- पादत्राणं खरेदी करताना अजिबात घाई करू नका. शांतपणे बसून वेगवेगळ्या प्रकारची पादत्राणं बघा. घाला आणि चालून बघा. सर्वात आरामदायी वाटणारी पादत्राणं विकत घ्या.









