पाथरीचे ग्रामस्थ उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार
ऑनलाईन टीम / बीड :
शिर्डी साईबाबांचा जन्म कुठे झाला यावरून शिर्डी आणि पाथरीत वाद सुरू आहे. हा वाद थोडा थंड झाला असतानाच आता त्यात बीडने उडी घेतलीय. साईबाबा हे बीडमध्ये नोकरीला होते असा दावा काही जणांनी केलाय.
साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. याठिकाणी साईबाबांनी नोकरी केली, त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी 100 कोटींचा निधी द्यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे.
दरम्यान, साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाला होता. त्यामुळे त्यामुळे साईबाबांचं जन्मस्थळ म्हणूनच पाथरीचा विकास व्हावा असा ठराव ग्रामस्थांचा ठराव पाथरीमध्ये पास करण्यात आला. आता पाथरीचे ग्रामस्थ याच संदर्भात उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत.