प्रतिनिधी /मडगाव
पाणी भरण्यासाठी म्हणून घरात आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी एका 22 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणातील पीडित मुलगी सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीवरुन संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली असल्याची माहिती मायणा -कुडतरी पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी काहींची जबानी नोंद करुन घेतलेली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केलेली असून अहवालाची पोलीस वाट पाहात आहेत तर संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली तसेच गोवा चिल्ड्रन्स ऍक्टखाली संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









