विनोद सावंत/कोल्हापूर
महापालिका पाणीपुरवठÎाच्या जिगरबाज कर्मचाऱयांच्या अथक प्रयत्नामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यांनी 12 दिवस अहोरात्र राबून आणि जीवाची पर्वा न करता 5 ते 7 फुट पाण्यातून जाऊन उपसा केंद्र सुरू केली. त्यांच्या या कामाचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.
महापुरामुळे पंचगंगा नदी लगत असणारे बालिंगा, नागदेववाडी आणि शिंगणापूर उपसा केंद्र पाण्यात गेल्याने टँकरने पाणी घेण्याची वेळ शहरातील नागरिकांवर आली. पाणीपुरवठा विभागाच्या वितरण आणि व्यवस्था विभागातील कर्मचाऱयांनी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले. त्यांनी 12 दिवस कुटूंबाकडे दुर्लक्ष केले. यामुळेच चार दिवसांनी बालिंगा, सहा दिवसांनी नागदेवाडी आणि 12 दिवसांनी शिंगणापूर उपसा केंद्र सुरू केले. वास्तविक महापालिका प्रशासनाने 2019 च्या महापुराचा अनुभव पाठीशी असताना उपसा केंद्राची उंची वाढविणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. प्रशासन नक्कीच यामध्ये कमी पडले. असे असले तरी आपत्तकालिन स्थितीमध्ये पाणीपुरवठÎाच्या कर्मचाऱयांनी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम नक्कीच उल्लेखनिय आहे.
मजुरापासून जल अभियंतापर्यंत 24 तास डÎूटीवर
पाणीपुरवठÎाच्या यांत्रिकी विभागामध्ये अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. ठोकमानधनावर काम करणाऱया कर्मचाऱयांवर येथील डोलारा आहे. शहराचे पाणी सुरू करण्यासाठी येथील मजुरापासून जल अभियंतापर्यंत सर्वजण 24 तास उपसा केंद्रात डÎूटीवर होते.
दुकान पाण्यात असताना कोल्हापुरच्या पाणीपुरवठÎाला प्राधान्य
पाणीपुरवठÎासोबत मोटर, पंप आणि ट्रन्सफॉर्मरची कामे करणाऱया बाहेरील व्यक्तींचेही मोलाचे योगदान मिळाले. यामध्ये सांगलीतील लक्ष्मी इलेक्ट्रीकचे हिंदूराव गुरव यांचे पुरामुळे सांगलीमधील दुकान पाण्यात गेले होते. त्यांनी याकडे दुर्लक्ष करत कोल्हापूरच्या पाणीपुरवठा सुरू करण्यास प्राधान्य दिले. रेनबो इलेक्ट्रीक ऍड इंजिनिअर्सचे काशिनाथ शिंदे यांना बाहेरील कामांची ऑर्डर आली असतानाही त्यांनी नाकरत पहिला कोल्हापूरचे पाणी सुरू करणार असे संबंधितांना सांगितले. साहित्य खरेदीसाठी स्वतः कडील 25 लाख रूपये गुंतवले.
पाणीपुरवठÎाचे रिअल हिरो
जल अभियंता अजय साळुंखे, उप-जल अभियंता जयेश जाधव, अरविंद यादव, अशोक मेंगाने, अशोक पाटील, संदेश सणगर, महादेव कनोजे, रोहित पारखे, अमोल पाटील, जयदीप पाटील, सतीश इंगळे, सर्जेराव जाधव, तानाजी पाटील, भारत नांगरे, कृष्णा पाटील, प्रमोद यादव, कुंडलिक उलपे, रेनबो इलेक्ट्रीक ऍड इंजिनिअर्सचे काशिनाथ शिंदे, सांगलीतील लक्ष्मी इलेक्ट्रीकचे हिंदूराव गुरव, मोहन गुरव आणि राम गुरव.
पूर्व नियोजनामुळे पाणीपुरवठा लवकर सुरू करण्यात यश
2019 च्या महापुराच्या अनुभवा होता. त्यानुसार पूर्व नियोजन केले. उपसा केंद्रात पाणी येण्यापूर्वीच मोटर पंप उतरून बाहेर काढल्या. यावर्षी हिटींगसाठी कारखान्याची शोधा शोध करावी लागली नाही. ट्रान्सफॉर्मर, कंट्रोल पॅनेल आणि मोटर दुरस्ती अशा तीन स्वतंत्र टिम केल्या. यामुळेच 2019 च्या तुलनेत सहा दिवस अगोदर पाणीपुरवठा सुरू झाला. –जयेश जाधव, उपजल अभियंता, महापालिका









