चिकबळ्ळापूर/प्रतिनिधी
गौरीबिदनूर तालुक्यातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी कर्नाटक सरकार शेजारील राज्य आंध्र प्रदेशबरोबर जल-वाटपाचे समीकरण विचारात घेत असल्याचे चिकबळ्ळापूर जिल्हा प्रभारी मंत्री के सुधाकर यांनी सांगितले. शुक्रवारी नगरपालिका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गौरीबिदनूर मध्ये पिण्याचे पाणी ही मुख्य समस्या आहे आणि आंध्र प्रदेशातून १० ते १५ टीएमसी पाणी मिळावे असा आम्ही विचार करीत आहोत, जे राज्याच्या इतर भागातून त्यांना परत देण्यात येईल. जलसंपदा मंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. याविषयी लवकरच याची अंमलबजावणी होईल, असे सुधाकर यांनी म्हंटले आहे.