ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात चार दिवसांपूर्वी जमावाने पाडलेले हिंदू मंदिर पुन्हा उभारण्यात येणार आहे. खैबर पख्तुनवा प्रांताचे मुख्यमंत्री मेहमूद खान यांनी तेथील स्थानिक वृत्तपत्रांना यासंदर्भात माहिती दिली.
खैबर पख्तुनवा प्रांताच्या करक जिल्ह्यातील टेरी भागात हिंदू मंदिराचे विस्तारीकरण सुरू होते. चार दिवसांपूर्वी या मंदिरावर शेकडो लोकांनी हल्ला चढवत तोडफोड केली, तसेच मंदिराला आग लावली. जमावाने हिंदू संत परमहंसजी महाराज समाधीचीही विटंबना केली.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी 40 जणांना अटक केली आहे. घटनेनंतर पाकिस्तान सरकारला जाग आली असून, हे मंदिर पुन्हा बांधण्यात येणार आहे.









