ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लोक लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार, उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. याच पार्श्भूमीवर योगी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार आता गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागातून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाख पेक्षा अधिक मजुरांना नोकरी आणि रोजगार दिला जाणार असल्याची घोषणा योगी सरकार ने केली आहे. तसेच यासाठी त्यांनी एक समिती देखील नेमली आहे आणि ही समिती या मजुरांना काम मिळवून देण्यासाठी काम करेल.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही या सर्व मजुरांना काम देणार आहोत. यांच्यासाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने रिव्हॉल्विंग फुंडमध्ये वाढ केली आहे. याच अंतर्गत महिला स्वयंसेवी गटांच्या कार्यांना उत्तेजन देऊन रोजगार निर्मिती केली जाईल. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









