प्रतिनिधी/ बेळगाव
ना ढोलताशांचा गजर, ना फटाक्मयांची आतषबाजी, ना वाजत गाजत मिरवणूक अत्यंत शांततेत सामाजिक अंतर राखत बुधवारी भक्तीपूर्ण वातारवणात पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मनपाने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन तलावांवर सांयकाळनंतर विसर्जनासाठी तुरळक भक्त दिसून येत होते. विधिवत पूजन करून ‘कोरोनाचे संकट दूर कर’ अशी गणयाराकडे मागणी करत निरोप देण्यात आला.
घराघरात प्रति÷ापना करण्यात आलेल्या गणरायाला बुधवारी जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. एकाचवेळी होणारी गर्दी टाळून दुपारपासूनच कुटुंबातील काही व्यक्तींना घेवून विसर्जन तलावावर दाखल होत होते. शहरातील कपिलेश्वर तलाव, नव्याने बांधण्यात आलेले कपिलतीर्थ तलाव, अनगोळ येथील विसर्जन तलाव, जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलाव, किल्ला शेजारील तलाव, रामेश्वर तलाव (जक्कीनहोंड), कणबर्गी तलाव व ब्रम्हनगर मजगाव येथील तलावावर येथे विसर्जन करण्यात आले.
कोरोनाचे संकट यावषीच्या गणेशोत्सवावर असल्यामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे सामाजिक अंतर राखत शांततेत विसर्जन करण्यात आले. महानगर पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या तलावांवर विसर्जन झाले. विसर्जन तलावांवर एकाचवेळी गर्दी होणार नाही यासाठी मनपा व पोलिस प्रशासनाने कंबर कसली होती.
अनेकांनी घरीच केले विसर्जन
यावषी कोरोनाचा धोका असल्यामुळे खबरदारी म्हणून अनेक गणेशभक्तांनी गर्दीत जाणे टाळले. अनेकांनी आपल्याच घरातील विहीरींमध्ये विसर्जन केले. तर काहींनी घरीच मोठय़ा बादलींमध्ये विसर्जन केले. यामुळे विसर्जन तलावांवर तितकीशी गर्दी दिसून येत नव्हती. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने बेळगावमधील नागरिकांनी ही खबरदारी घेतली आहे. याच बरोबर दरवर्षी 11 दिवस प्रति÷ापना करणाऱया मंडळींनीही पाचव्या दिवशी गणयायाला निरोप दिला.









