लखनौ
उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. मतदानाचा पाचवा टप्पा 27 फेब्रुवारीला पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात 61 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यासाठी शुक्रवारी प्रचारतोफा थंडावल्या. अखेरच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव या नेत्यांच्या जाहीर सभा पार पडल्या. निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राजकीय नेते एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले.









