वार्ताहर / पाचगाव
पाचगाव परिसरातील हरी पार्क मध्ये नळाला आळी मिश्रित दूषीत व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाचगाव परिसरातील हरी पार्क सावरकर नगर पोस्टल कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात आळी मिश्रित पाणी पुरवठा होत आहे. या पाण्याला दुर्गंधी देखील येत आहे .या दूषित पाण्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. या परिसरातील पाईप लाईनलाही अनेक ठिकाणी गळती लागली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर या दूषित पाण्यामुळे अनेक लहान मुले व नागरिक आजारी पडत आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पाणी पुरवठा विभागाने तात्काळ याची दखल घेऊन स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
Previous Articleपाकिस्तानमध्ये रेल्वे-बस अपघातात 19 शीख भाविकांचा मृत्यू
Next Article आजारास कंटाळून कणेरीत एकाची आत्महत्या








