पाचगाव / वार्ताहर
कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव परिसरात पैशाच्या वादातून मारहाणीचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पाचगाव व साने गुरुजी वसाहतीमधील संशयित दोन खाजगी सावकारांना अटक करण्यात आली आहे. पैशाच्या वादातून संतोष रमेश वाघमारे राहणार गुलमोहर कॉलनी पाचगाव याला मारहाण करून जखमी करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष रमेश वाघमारे वय 34 राहणार गुलमोहर कॉलनी पाचगाव यांनी महेश भोळे यांच्या कडून चार वर्षांपूर्वी एक लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात वाघमारे यांनी भोळे यांनी आतापर्यंत एक लाख 80 हजार रुपये दिले आहेत. मात्र महेश भोळे हा वाघमारे यांच्याकडे आणखी चार लाख रुपयांची मागणी करत होता. संतोष वाघमारे चिंचवडे येथे मित्रांसह गेले होते. तेथे संशयित महेश भोळे व रणजित भोपळे यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्याला संतोष वाघमारे यांनी नकार दिला त्यामुळे चिडलेल्या संशयित महेश भोळे यांनी धारदार शस्त्राने रमेश वाघमारे त्यांच्या डोक्यावर वर्मी घाव घातला तर संशयित रणजीत भोपळे यांनी ही काचेच्या सोडावॉटरच्या बाटलीने वाघमारे यांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत संतोष वाघमारे यांनी करवीर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









