ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळील केरी भागात आज पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा JCO (कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसर) शहीद झाला.
राजेश कुमार असे शहीद झालेल्या JCO चे नाव आहे. प्रो (डिफेन्स) जम्मूचे लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी जेसीओच्या हत्येला दुजोरा दिला. राजौरीच्या केरी सेक्टरमध्ये ही घटना घडली.
पाकिस्तानी सैन्याने केरी भागात नियंत्रण रेषेपलीकडे गोळीबार केला. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या भारतीय जवानांनी पाकला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यावेळी गोळीबारात राजेश कुमार जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.









