वृत्तसंस्था/ लाहोर
पाकचा 19 वर्षाखालील युवा क्रिकेट संघाचा नियोजित बांगलादेश दौरा सहा दिवसांनी लांबणीवर टाकण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कारणास्तव पाकचा युवा क्रिकेट संघ 11 एप्रिलऐवजी 17 एप्रिलला ढाक्याला रवाना होणार आहे.
या दौऱयात पाक आणि भांगलादेश युवा क्रिकेट संघातील चार दिवसांचा पहिला सामना 23 एप्रिलपासून सिलेट येथे आयोजित केला आहे. यानंतर उभय संघात पाच सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मलिकेतील पहिले तीन सामने सिलेट येथे तर शेवटचे दोन सामने ढाका येथे होतील. पाक युवा संघासाठी सध्या लाहोरमध्ये सराव शिबीर सुरू आहे.









