वृत्तसंस्था/ कराची
पाकचा डावखुरा फिरकी गोलंदाज असिफ आफ्रिदीवर भ्रष्टाचार विरोधी नियमाखाली पीसीबीने दोन विविध नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज असिफ आफ्रिदी याच्या बंदी कालावधीला 12 सप्टेंबर 2022 पासून प्रारंभ करण्यात येणार आहे. यापूर्वी त्याच्यावर हंगामी स्वरुपाची बंदीची कारवाई करण्यात आली होती. दोन विविध सामन्यामध्ये आफ्रिकडून शिस्तपालन नियमांचा भंग झाला होता. या प्रकरणाची सुनावणी पीसीबीच्या शिस्तपालन समितीच्या झाली. आतापर्यंत असिफ आफ्रिदीला पाकच्या राष्ट्रीय संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी संधी मिळाली नाही. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया संघाच्या पाक दौऱयातील टी-20 आणि वनडे मालिकांसाठी निवडण्यात आलेला पाक संघांमध्ये असिफ आफ्रिदीचा समावेश होता पण त्याला अंतिम अकरा खेळाडूत घेण्यात आले नव्हते. पाक सुपर लिग क्रिकेट स्पर्धेत आसिफ आफ्रिदी मुल्तान सुल्तान्स संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता.









