ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
मनी लाँड्रिंग, तसेच दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यात अपयश आल्याने फायनान्शयिल ॲक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला ‘ग्रे’ यादीत कायम ठेवले आहे. एफएटीएफही दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
संघटनेचे अध्यक्ष मार्कस प्लिअर म्हणाले, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार आणि दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखण्यात पाकिस्तान सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे पाकिस्तान ग्रे यादीत कायम राहील. संयुक्त राष्ट्रांनी सुचिबद्ध केलेले 1267 दहशतवादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पाकिस्तानने कारवाई करणे आवश्यक होते. तसेच त्यांचा वित्तपुरवठा रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा तयार करावी लागेल. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या संघटनांच्या म्होरक्यांचा तपास करून त्यांच्यावर खटले भरावेत, असे या संघटनेने पाकिस्तानला सुनावले आहे. या म्होरक्यांमध्ये हाफीज सईद आणि मसूद अझर यांचाही समावेश आहे.