पाक वायुक्षेत्रात जाणे टाळण्याची सूचना
पाकव्याप्त काश्मीर विभागात मोठय़ा प्रमाणावर संघर्ष सुरू असल्याने पाकिस्तानात केव्हाही वातावरण चिघळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे अमेरिकन विमानांनी पाकिस्तानी वायुक्षेत्रात प्रवेश करणे टाळावे, अशी सूचना अमेरिकेने केली आहे. अमेरिकेच्या वायुप्रवास विभागाने हा इशारा दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणाव आहे. दोन्ही देशांनी सीमेनजीक लढाऊ विमाने आणून ठेवली आहेत. तसेच मोठय़ा प्रमाणावर शस्त्रसाठाही करून मोठय़ा संघर्षाला तोंड देण्याची तयारी चालविली आहे. अशा स्थितीत अमेरिका व इतर विदेशी विमानांनी पाकिस्तानला जाणे कमी करावे किंवा किमान मर्यादित करावे. भारत आणि पाकिस्तान यांचा उद्देश युद्ध करणे हा नाही.
तथापि, पाकव्याप्त काश्मीरात आणि भारत-पाक सीमेवर असलेला तणाव पाहता या तणावाचे रूपांतर मोठय़ा संघर्षात होऊ शकते. त्यामुळे अमेरिकेने दक्षता घ्यावी, असे आवाहनही अमेरिकेच्या सूत्रांनी केले आहे.









