ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या रस्त्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे पोस्टर्स लागले आहेत.
मुस्लिम लीगचे नेते अयाज सादिक यांच्या मतदारसंघात म्हणजेच लाहोरच्या रस्त्यांवर हे पोस्टर्स जाणीवपूर्वक लावण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पक्षाने हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समध्ये अयाज सादिक यांना देशद्रोही म्हणत त्यांची तुलना मीर जाफरसोबत केली गेली आहे. तर काही पोस्टर्समध्ये सादिक यांना वर्धमान यांच्या रुपात दाखवण्यात आले आहे. त्यांना भारताचा समर्थक आणि पाकिस्तानचा शत्रू ठरवण्यात आले आहे.
सादिक यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या संसदेत म्हटले होते की, पाकिस्तानने भारताच्या अभिनंदन यांनी सुटका भीतीपोटी केली होती. त्या वक्त्याव्यावरून शरीफ यांच्या पक्षाने सादिक यांना घेरले आहे. मात्र, तरी देखील सादिक त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत.









