ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे जगभरातील अनेक देशांनी लसीकरणाचा वेग वाढवला असतानाच पाकिस्तानातील लसींचा काळाबाजार समोर आला आहे. पाकिस्तानात रशियाची स्पुतनिक-व्ही लस टोचून घेण्यासाठी 12 हजार पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे 5800 रुपये मोजावे लागतात.
लसीकरण मोहीम तीव्र करण्यासाठी भारताने लसींची निर्यात तात्पुरती थांबवली असली, तरी पाकिस्तानसारखा देश आहे, जिथे लसीच्या नावाखाली भ्रष्टाचारही होत आहे. पाकिस्तानात कोरोना लस केवळ फ्रंट लाईन वर्कर्स आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जात आहे. लसीसाठी एवढे पैसे मोजूनही पाकिस्तानात लसीकरण करण्यासाठी तासन् तास थांबावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.









